मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाकडून देशातील पहिला ‘ईव्ही’केंद्रित एक्सचेंज ट्रेडेड फंड दाखल
मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाने नवीन युगातील वाहन उद्योग आणि इलेक्ट्रिक वाहने अर्थात ‘ईव्ही’वर केंद्रित भारतातील पहिला एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) गुंतवणुकीसाठी खुला केला आहे.
मुंबई : मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाने नवीन युगातील वाहन उद्योग आणि इलेक्ट्रिक वाहने अर्थात ‘ईव्ही’वर केंद्रित भारतातील पहिला एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) गुंतवणुकीसाठी खुला केला आहे.या नवीन ‘मिरॅ ॲसेट निफ्टी ईव्ही ॲण्ड न्यू एज ऑटोमोटिव्ह ईटीएफ’ नावाच्या योजनेसाठी नवीन फंड ऑफर (एनएफओ) २४ जूनपासून गुंतवणुकीसाठी खुली झाली असून, ती ५ जुलै रोजी बंद होईल. ही ‘निफ्टी ईव्ही ॲण्ड न्यू एज ऑटोमोटिव्ह टोटल रिटर्न इंडेक्स’ या निर्देशांकाची प्रतिकृती असणारी एक गुंतवणुकीसाठी कायम खुली असणारी (ओपन-एंडेड) योजना आहे.
या ईव्ही-केंद्रित फंडाचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना गतिशील आणि वेगाने बदलत असलेल्या भारताच्या वाहन क्षेत्राच्या चेहऱ्यात योगदान देणाऱ्या आणि संपूर्ण मूल्य साखळीत आघाडीवर असलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलवृद्धीची संधी गुंतवणूकदारांना प्रदान करणे आहे. योजनेतून नव्या युगाचे ईव्ही आणि हायब्रिड वाहने, बॅटरी उत्पादन, ऑटोमेशन यासारख्या वर्तमान आणि उदयोन्मुख विस्कळीत तंत्रज्ञानामध्ये गुंतलेल्या कंपन्यांच्या संपूर्ण परिसंस्थेत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न असेल. यातून ‘फेम’ आणि पीएलआय यासारख्या प्रमुख सरकारी योजनांत सहभागी कंपन्यांनादेखील लक्ष्य केले जाईल.एकता गाला आणि अक्षय उदेशी यांच्याद्वारे व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या योजनेमध्ये, एनएफओ कालावधीदरम्यान किमान प्रारंभिक गुंतवणूक ५,००० रुपये आणि त्यानंतर एक रुपयाच्या पटीत करता येईल.